ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘मेरे पास माँ है’…,बारामतीतील प्रतिष्ठेच्या लढतीत कोण ठरणार ‘गेमचेंजर’

कौटुंबिक कलहामुळे सामना बनला धारदार

बारामती : मविआचे उमेदवार युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार हे दोघेही या वादात उतरले. श्रीनिवास यांनी माझी आई असे बोलूच शकत नाही असे सांगत अजित पवार यांचे म्हणणे खोडून काढले. तिला अजित जसा पुत्र म्हणून प्रिय तसा नातू म्हणून युगेंद्रही प्रिय असल्याचे सांगितले. तर शर्मिला यांनी राजकारणात आईंना ओढू नका, या शब्दांत सुनावले. त्यामुळे या निवडणूकीत कौटुंबिक कलह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी सोशल मिडियावरून त्यानंतर आईसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करत ‘मेरे पास माँ है’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रचाराची राळ मात्र कुटुंबातील कलहाने सुरु झाली. आता निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. बारामतीचे मैदान आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे स्थानिक नेतेच सांभाळत आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून राज्यभर प्रचारासाठी फिरत आहेत. शरद पवार यांना त्यांच्या पक्षासह मविआकडून प्रचारासाठी मोठी मागणी राज्यातून आहे. त्यामुळे सध्या तरी हे दोन्ही नेते बारामतीत नाहीत, ते आता थेट सांगता सभेलाच हजेरी लावतील, अशी चिन्हे आहेत. बारामतीच्या मैदानात आता आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे.

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणूकीतही बारामतीत घरातच प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. लोकसभेवेळी उफाळून आलेला कौटुंबिक कलह विधानसभा प्रचारातही दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक यंदा कमालीची धारदार बनली आहे.

बारामती विधानसभेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पण खरी लढाई इथे महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात होत आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर सुरुवातीला कौटुंबिक पातळीवर टीका टिप्पणी टाळली जात होती. परंतु लोकसभा आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीत कौटुंबिक बाबी चव्हाट्यावर आणल्या जात असल्याने ही निवडणूक कमालीची धारदार बनली आहे. ही निवडणूक राज्यात जितकी रंगतदार आणि अटीतटीची होईल त्यापेक्षा तिला असलेल्या कौटुंबिक किनारीचीच सध्या जास्त चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

लोकसभेतील पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. कच्चे दुवे साधत त्यांनी विधानसभेला त्यांनी पूर्ण ताकदीने लढाई सुरु केली. परंतु प्रचाराच्या पहिल्याच सभेत त्यांनी माझी आई नको म्हणत असताना माझ्याविरोधात घरातील उमेदवार दिला गेला. कोणी दिला तर साहेबांनी सांगितले. मग पवारसाहेबांनी आमचे घर फोडले का, असे सांगत आयतेच कोलीत शरद पवारांच्या हातात दिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी घरातील वडीलधारी म्हणून मी नेहमीच कुटुंब एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. मला आई-वडील, भावांनी घरे फोडण्याची शिकवण दिली नाही, या शब्दांत अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button