ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘नगरसचिव कराराधिष्ठित’ पदासाठी उल्हास जगताप यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा : महापालिका नगरविकास विभागाचे कामकाज होणार सुरळीत

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभा शाखेचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी ‘नगरसचिव कराराधिष्ठित’ या पदावर अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील जाहिरात महापालिकेकडून २५ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या १० जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली असून, पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या जाहिरातीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त श्री. उल्हास बबनराव जगताप यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी अर्ज सादर केला होता.

महापालिका प्रशासनाने त्यांच्या अर्जासह सादर केलेल्या कागदपत्रांची तपशीलवार छाननी केली असता, जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अर्हता व निकषांची पूर्तता होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सभा विषयक आणि प्रशासकीय कामकाजाचा त्यांना व्यापक अनुभव असल्याने सभा शाखेचे काम प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा –  टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारापदाबाबत ट्विस्ट; श्रेयस अय्यरची चर्चा सुरु असताना अचानक आणखी एका खेळाडूची एन्ट्री

दरम्यान, हे पद पूर्णपणे करार पद्धतीवरील आणि विशिष्ट कामकाजापुरते मर्यादित असणार आहे. नियुक्त अधिकाऱ्यास कोणतेही प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार देण्यात येणार नसून, या नियुक्तीमुळे नियमित सेवेत समावेशाचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे श्री. उल्हास बबनराव जगताप यांची ‘नगरसचिव कराराधिष्ठित’ पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी करार पद्धतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्याबाबत महापालिकेच्या स्तरावर विचार सुरू आहे.

विद्यमान नगर सचिव मुकेश कोळप यांना दणका

महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज अचूक होण्याबाबत नगरसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. मात्र, पदोन्नतीने नगरसचिव झालेल्या कोळप यांना या विभागाचे कामकाज हातळणे जिकीरीचे झाले आहे. दि. २० एप्रिल रोजी तहकूब झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसचिव यांनी महापौर रवी लांडगे यांनी विषय वाचण्यासाठी दिला. त्यावेळी अर्थसंकल्प संदर्भातील विषय मंजूर आणि बाकी सभा तहकूब अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी महापौर आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली. तसेच, प्रसारमाध्यमांमध्येही त्याचे पडसाद उमटले होते. वास्तविक, नगरसचिवांनी जो विषय दिला तो मी वाचला, ती चूक नगरसचिवांची आहे, असे जाहीरपण सांगितले होते. त्याचाच फटका मुकेश कोळप यांना बसला आहे. त्यांना दिशा देण्यासाठी उल्हास जगताप यांना रुज करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button