ताज्या घडामोडीपुणे

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर

पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा काकडे यांनी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. उषा काकडे या ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात.

हेही वाचा –  छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

संजय काकडे यांचा अल्पपरिचय
संजय काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार होते. अपक्ष खासदार म्हणून संजय काकडेंनी भाजपला केंद्रात पाठींबा दिला होता. संजय काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय काकडे यांची निर्णायक भूमिका असते. संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.

पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे. संजय काकडे हे मूळचे बांधकाम व्यवसायिक आहेत. १९८६ पासून त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठं काम केलं आहे. ‘संजय काकडे ग्रुप’ या नावाने त्यांची कंपनी आहे. 2017 मध्ये संजय काकडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगर पालिकेची जबाबदारी दिली होती. तेव्हापासून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली. काकडेंनी पुण्याचं स्वतःचे कौशल्य वापरुन भाजपला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून त्यांची एक राजकीय अभ्यासक म्हणून ओळख निर्माण झाली.

लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी दिली. तीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. काकडे यांना बांधकाम क्षेत्रातील मोठा अनुभव असल्याने त्यांच्या सहकार्याने सरकारने टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले. काकडेंच्या अभ्यासू वृत्तीमुळे पुणे मनपाचे ८०० कोटी वाचल्याचा दावा केला जातो. संजय काकडे यांना पक्षाने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली होती. त्या काळात त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पक्षासाठी काम केलं. मात्र मागच्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button