महिला दिनानिमित्त रेल्वेत महिला तिकीट तपासणीसांचे पथक तैनात
महिला टीसींनी सांभाळली ‘वंदे भारत’ची कमान

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे वंदे भारत एक्स्प्रेसमधील महिला तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त या रेल्वेत महिला तिकीट तपासणीसांचे पथक तैनात करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या महिलांच्या नेतृत्वाखालीच वंदे भारत रेल्वे तिकीट तपासणीसांचे पथक तैनात करण्यात आले. हा उपक्रम महिला सबलीकरणासाठी आयोजित करण्यात आला होता. महिला दिनानमित्त या रेल्वेत पाच महिला तिकीट तपासणीसांची नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण
तिकीट तपासणीस पथकात यांचा समावेश
वंदे भारतमध्ये महिला दिनी तैनात करण्यात आलेल्या पथकात मुख्य तिकीट निरीक्षक शिल्पा सी. भालेकर, प्रीती व्ही. धवणे यांच्यासह प्रवासी तिकीट तपासनीस अहिल्या व्ही. राठोड, लॉर्डेस डी. कॉनलोन, वरिष्ठ तिकीट निरीक्षक लक्ष्मी आर. फुलारी यांचा समावेश होता.