‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ‘विशेष समिती’ राबवा’; आमदार हेमंत रासने यांची मागणी

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. शहरातील पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी पुण्यासाठी विशेष धोरण राबविण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रासने यांनी सांगितले.
शहरातील अनेक वाड्यांचे बांधकाम अतिशय जीर्ण अवस्थेत असून, नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत आहे. प्रचलित नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांचा पुनर्विकास रखडलेला असल्याचे रासने म्हणाले. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी रासने यांनी फडणवीस यांना पत्र देऊन केली आहे. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा – राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत पीसीपीचे घवघवीत यश
हेमंत रासने यांची फेसबुक पोस्ट
कसबा मतदारसंघासह पुणे शहरात असणाऱ्या जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी आपली आग्रही भूमिका असून या संदर्भात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत शासकीय धोरणामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
विद्यमान नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी यावेळी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही होईल.