Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चांदणी चौक जलवाहिनी गळती; उद्या उशिराने पाणीपुरवठा

पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने महापालिकेकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चांदणी चौक झोनमधील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

मंगळवार, दि. १ जुलै रोजी या भागांमध्ये सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी योग्य ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा – मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढ, ७ जुलै पर्यंत भरा कर

पाणीपुरवठा बंद असणारे भाग :

चांदणी चौक टाकी परिसर, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल व मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, सारथी शिल्प, पूजा पार्क, शांतीबन, डुक्करखिंडी परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button