Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चऱ्होलीच्या शहरीकरणावर डाक विभागाचा ‘स्टँम्प’

नवीन डाक उप विभागीय कार्यालयाचे लोकार्पण : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चऱ्होली आणि परिसराच्या शहरीकरणावर आणि डेव्लपमेंटवर अखेर भारतीय डाक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. चऱ्होलीला ग्रामीण ऐवजी आता शहरी ‘पिन कोड’ मिळाला आहे.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे चऱ्होली येथे असलेल्या शाखा डाक घरामार्फत देण्यात येणाऱ्या पोस्टाच्या सेवांवर अतिरिक्त ताण येत होता. या पार्श्वभूमीवर चऱ्होलीला शहरी पिन कोड मिळावा आणि डाक उप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय डाक विभागाने घेतला. त्यासाठी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि आज डाक कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा  : PCMC: हवा प्रदूषणाच्या विरोधात वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा एल्गार! 

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये आणि पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, अजित बुर्डे, माजी नगरसेवक, सुवर्णा बुरडे, माजी नगरसेवक सुनील काटे, गणेश सस्ते, योगेश तळेकर, सहायक अधीक्षक डाकघर जुन्नर उपविभाग भूषण देशमुख, सहाय्यक अधीक्षक वेस्ट सब डिव्हिजन मुन्ना कुमार, निरिक्षक डाकघर खेड उपविभाग मारुती मेढे, तक्रार निरीक्षक पुणे ग्रामीण विभाग लक्ष्मण शेवाळे व चऱ्होली परिसरतील नागरिक उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी चऱ्होली शाखा डाकघराचे उपडाकघरात रूपांतर करण्याचा प्रस्ताव डाक विभागाला सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाला आणि जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर नवीन चऱ्होली उपडाकघराचे उद्घाटन करण्यात आले. डिलिव्हरी उपडाकघराचा दर्जा मिळाल्यानंतर आता चऱ्होली ला स्वतंत्र 411081 हा पिनकोड प्राप्त झाला आहे. हा पिन कोड चऱ्होली, वडमुखवाडी, निरगुडी, डूडूळगाव व चोवीसावाडी व परिसरातील वाड्या वस्त्या यांना लागु राहील.

डाक मेळाव्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद…

यावेळी प्राताविक करताना पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी डाक विभागाच्या सर्व बचत योजना, आधार कार्ड अध्यतन सेवा, डाक विमा योजना,अपघाती विमा योजना तसेच पार्सल पाठवण्याची सुविधा या सेवांचा लाभ चऱ्होली उपडाकघरामार्फत ग्रामस्थांना घेता येणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. चऱ्होली उपडाकाघराचे प्रथम उपडाकपाल म्हणून बबन ढेरंगे यांची नियुक्ती केली आहे. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला विमा प्रतिनिधी व महिला कर्मचारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आज डाक मेळावा याचे पण आयोजन करण्यात आले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button