Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डॅा. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस

पुणे :  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी चर्चेत आहे. या घटनेचे पुणे शहरासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. राज्य शासनाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, गठित केलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समितीने तिसरा अहवाल सादर करणे बाकी आहे.

या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ञ डॅा. सुश्रुत घैसास यांचे नाव पुढे आले होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील आहे. आता या प्रकरणात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) घैसास यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार डॅा सुश्रूत घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे.

गेल्या आवड्यात एमएमसीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून महिलेच्या मृत्यूप्रकरणी किती डॅाक्टर सहभागी होते याची माहिती मागवली होती. त्यानंतर एमएमसीच्या नोटीसीला उत्तर देताना डॅा. घैसास या महिलेच्या उपचारात सामाविष्ठ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर एमएमसीने डॅा. घैसास यांना नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा –  ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नेतेमंडळींदेखील मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशानावर ताशेरे ओढत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली असून चौकशी केली जात आहे.

यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चालवावे, डॉ. धनंजय केळकर यांच्यासह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी देखील मागणी सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी शुक्रवारी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button