क्रिडाताज्या घडामोडी

रोहित शर्माचा विसरभोळेपणा हा सर्वश्रूत

मोबाईल, पासपोर्ट, घड्याळ या सारख्या वस्तू अनेकदा विसरला

 दिल्ली : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मुलाखत समोर आली आहे. या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. या मुलाखतीत दोघांनी दिलखुलासपणे आपलं म्हणणं मांडलं. गौतम गंभीरच्या मुलाखतीवरच विराट कोहलीचं भागलं नाही. विराट कोहलीचा पुढचा गेस्ट हा रोहित शर्मा असणार आहे. या बाबतचा खुलासा विराट-गंभीर मुलाखतीत झाला. गौतम गंभीरने आपल्या मुलाखतीच्या शेवटी विराट कोहलीला विचारलं की, पुढचा गेस्ट रोहित शर्मा असणार आहे. कर्णधार रोहित शर्माला पहिला प्रश्न काय विचारणार? असं गौतम गंभीरने विचारलं. विराट कोहलीचा हा प्रश्न आपसूकच त्याच्या विसरभोळेपणावर असणार आहे. विराट कोहलीने सांगितलं की, माी त्याला पहिला प्रश्न विचारणार की सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खातो की नाही? रोहित शर्मासोबत मुलाखतीबाबत विराट आणि गंभीर यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ समोर आला आहे.

रोहित शर्माला बदाम खातो की नाही हा प्रश्न विचारणार असल्याचं ऐकून गौतम गंभीरने त्यात आणखी एक भर घातली. गौतम गंभीरने सांगितलं की, त्याला विचार की सकाळी 11 ऐवजी रात्री 11 वाजता का आला? असा हसतखेळत विराट कोहली आणि गौतम गंभीरची मुलाखत संपली. विराट कोहलीने बदाम खाण्याबाबतचा प्रश्न विचारणं सहाजिकच आहे. कारण रोहित शर्माला विसरण्याची सवय आहे. रोहित शर्मा मोबाईल, पासपोर्ट, घड्याळ या सारख्या वस्तू अनेकदा विसरला आहे. भिजलेला बदाम खाल्याने बुद्धीला चालना मिळते, तर आठवण चांगली राहते असं म्हंटलं जातं.

कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से समोर आले आहे. एकदा तर रोहित शर्मा एंगेजमेंट रिंग विसरला होता. अचानक त्याला सहकारी मित्राच्या हातातील रिंग पाहून आठवण आली आणि शोधाशोध सुरु झाली. इतकंच काय, रोहित शर्मा नाणेफेकीवेळी अनेकदा नेमकं काय घ्यायचं आहे हे देखील विसरला आहे. त्यामुळे रोहित शर्माचा विसरभोळेपणा हा सर्वश्रूत आहे. विराट कोहलीनेही त्याच्या मुलाखतीत अनेकदा याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button