भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जन्मदिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाचे शिल्पकार आणि देशाला प्रजासत्ताक बनवणाऱ्या या महामानवाच्या स्मृतींना उजाळा देताना उपस्थितांनी बंधुभाव आणि समतेचा संदेश जपला. “बाबासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळते. त्यांच्या चरणी लीन होऊन बहुजन समाज एकत्र येतो आणि बंधुभाव वाढवतो,” असे भावनिक उद्गार उपस्थितांनी काढले.
या अभिवादन सोहळ्यात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख अमोल देवळेकर, भरत कुंभारकर, मकरंद पेठकर, उत्तम भुजबळ, युवासेना अधिकारी सनी गवते, विभाग प्रमुख राजेश मोरे, अनिल दामजी, भगवान वायाळ, प्रवीण डोंगरे, चंदन साळुंके यांच्यासह महिला नेत्या प्रा. विद्या होडे, उपशहर संघटिका रोहिणी कोल्हाळ, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, करूणा घाडगे, विजया मोहिते, सोनाली जुनवणे, स्मिता पवार यांनी सहभाग घेतला. तसेच परेश खांडके, सोनू पाटील, अजय परदेशी, शंकर साठे, अनिल परदेशी, हनुमंत दगडे, शिवाजी मेलेकरी, सचिन घोलप, गिरीष गायकवाड, संजय गवळी, अमोल घुमे, नागेश खडके, बकुळ डाखवे, झुबेर तांबोळी, राहुल शेडगे, समीर खान, परवेश राव, विलास कथलकर, नितीन थोपटे आणि सूर्यकांत पवार उपस्थित होते.
हेही वाचा – खडसेंचा ‘तो’ आरोप महाजनांच्या जिव्हारी; खडसेंसह अनिल थत्तेंना खेचलं कोर्टात
या सोहळ्यात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना संविधानाच्या मूल्यांना जीवनात अंगीकारण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. बाबासाहेबांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात एकता निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.