खडसेंचा ‘तो’ आरोप महाजनांच्या जिव्हारी; खडसेंसह अनिल थत्तेंना खेचलं कोर्टात

Girish Mahajan : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर IAS महिलेशी संबंध जोडल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर महाजन यांनी खडसेंनी पुरावे दाखवले तर मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेन असे ओपन चॅलेंज दिले होते. दरम्यान, आता महाजन यांनी थेट खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना कोर्टात खेचलं आहे.
गिरीश महाजन यांनी खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे. माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
कोणतेही पुरावे न देता पत्रकार अनित थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर टीका केली. जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळं आता त्यांच्याशी कायद्यानुसार लढणार असल्याचे महाजन यांनी यावेळी म्हटलं आहे. महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे माहिती एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – निवडणूक लागू द्या, हिसका दाखवतो; राम सातपुतेंचे मोहिते पाटलांना चॅलेंज
गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.
त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितलं की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजन यांनी आरोप फेटाळत नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. असे सांगितलं.
त्यावर अमित शाह यांनी त्यांना सांगितलं की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझं सीडीआर खरं बोलतो. रोज बोलण्याचं काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले”, असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.