Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त पदवीपूर्व स्तरावरील फार्मा अ‍ॅड-मॅड स्पर्धेचे आयोजन

पुणे: ६४ व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, येथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA) यांच्या सहकार्याने पदवीपूर्व स्तरावरील फार्मा अॅड-मॅड स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी १८ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी फार्मसी, आरोग्यसेवा व सामाजिक जाणीव यांवर आधारित नाविन्यपूर्ण जाहिराती सादर करून आपली सर्जनशीलता, संवादकौशल्य, संघभावना व व्यावसायिक जाणीव प्रभावीपणे व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या व्यवस्थापन व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी समन्वयक म्हणून प्रा. नीलाक्षी नेरकर व प्रा. निकिता निकम यांनी जबाबदारी पार पाडली. यासाठी प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा –  आरसीबीने रचला इतिहास! दिल्लीचं ‘विराट’ लक्ष्य पार करत दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद; स्मृती-जॉर्जियाची विक्रमी भागीदारी

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. विकास शेंडे व प्रा. रुचा पुसेगावकर यांनी परीक्षक म्हणून केले. मान्यवर परीक्षकांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. या स्पर्धेत मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी, यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर एम.एम. कॉलेज ऑफ फार्मसीने उपविजेतेपद मिळवले.

या कार्यक्रमास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल कुंभार यांनी संबोधित केले. तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा. किरण चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार श्री. विलासराव लांडे, सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित दा. गव्हाणे, तसेच विश्वस्त श्री. विक्रांत लांडे व श्री. सुमित मुंगसे यांनी उपस्थित राहून यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना मिळाली तसेच सार्वजनिक आरोग्य व समाजजागृतीमध्ये फार्मासिस्टची भूमिका अधोरेखित झाली. सहभागी सर्व संघ व आयोजकांच्या कौतुकासह कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button