ताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंडिगोचे विमानाला मोसमी पावसाचा मोठा फटका

विमानावर गारांचा पाऊस, २२७ प्रवाशांची पाचावर धारण

राष्ट्रीय : राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असतानाच आता मान्सून पूर्व पावसाने राजधानी दिल्लीत धुमाकुळ घातला आहे. दिल्ली ते श्रीनगराला उड्डाण करणारे इंडिगोचे विमानाला मोसमी पावसाचा मोठा फटका बसला. या विमानात २२७ प्रवासी असताना अचानक वातावरण बदल होऊन गारांचा मारा सुरु झाला.विमानातील प्रवाशांचा पाचावर धारण बसली. या गारांच्या माऱ्याने विमानाचे नाकच तुटल्याने या विमानाची श्रीनगर येथे इमर्जन्सी लँडींग झाली. सर्व प्रवासी सुखरुप असून विमानाला मोठे नुकसान झाल्याने हे विमान दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे.

इंडिगो फ्लाइट 6E2142 या दिल्ली ते श्रीनगरला जाणाऱ्या विमानाला बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागला आहे. वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत या विमानाची श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग झाली. विमानातील सर्व २२७ प्रवासी सुरक्षित असून गारांच्या माऱ्याने विमानाच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एअरलाइनने या विमानाला AOG घोषीत केले आणि या विमानाला दुरुस्त करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा –  सांगलीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागात पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

या विमानात एकूण २२७ प्रवासी होते. खराब हवामानाचा सामना करावा लागल्याने अखेर वैमानिकाने कर्मचाऱ्यांना सावध करीत श्रीनगर विमानतळाच्या एअर ट्रॅफीक कंट्रोलला संदेश पाठवत इमर्जन्सी लँडींगची तयारी करण्यास सांगितले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे २२७ प्रवाशांनी भरलेले हे विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रु मेंबर पूर्णपणे सुरक्षित आहे. जोरदार गारांनी विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

इंडिगोचा गोव्यासाठी सल्ला
इंडिगो एअरलाइन्सने गोव्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इशारा दिला आहे. राज्याच पावसाची शक्यता असून सुरू असलेल्या पावसामुळे विमान वाहतूक प्रभावित होऊ शकते, त्यामुळे विमान उड्डाणांना विलंब होऊ शकतो असे इंडिगो कंपनीने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button