Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात तुतारीसाठी ४३ जण इच्छूक

पुणे :  अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले होते.

त्यात ४३ जणांनी पुण्यातून लढण्याची तयारी दर्शविली आहे. दि.१० सप्टेंबरपर्यंत हे अर्ज आलेले असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या अर्जांमध्ये सर्वाधिक ९ अर्ज खडकवासला विधानसभा मतदारसंघ, ८ अर्ज शिवाजीनगर तर ७ अर्ज वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून आले असून सर्वात कमी अवघा एक अर्ज कसबा विधानसभा मतदारसंघातील आहे.तर, राष्ट्रवादीकडून स्वत: जगताप यांच्यासह माजी नगरसेवक तसेच पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीकडून सर्वच मतदारसंघासाठी अर्ज मागविण्यात आले असले तरी महाविकास आघाडीच्या प्राथमिक चर्चेनुसार खडकवासला, हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ पवार गटाला मिळणार आहे.

हेही वाचा    –    Pimpri-Chinchwad | हॉटेलमध्ये गोळीबार, अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक 

तर, पवार गटाकडून पर्वती विधानसभा मतदारसंघाचीही पुण्यात मागणी करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना उध्द्व ठाकरे गटालाही ही जागा हवी असून ही जागा राष्ट्रवादीला दिल्यास शिवसेनेला राज्यात मुंबईत अथवा इतरत्र एक जागा दिली जाऊ शकते, असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

कोणत्या मतदारसंघात कोण इच्छूक

– हडपसर : प्रशांत जगताप, प्रवीण तुपे, योगेश ससाणे, सुनील गायकवाड, नीलेश मगर

– वडगावशेरी : बापूसाहेब पठारे, सरेंद्र पठारे, रमेश आढाव, सुनील खांदवे, नीता गलांडे, अर्जून चव्हाण, मेघा कुलकर्णी, भिमराव गलांडे, आशिष माने.

– शिवाजीनगर : उद्य महाले, किशोर कांबळे, श्रीकांत पाटील, अॅड. निलेश निकम , अॅड. सुकेश पासलकर , अॅड. औदूंबर खुनेपाटील, अरूण शेलार, डाॅ. किसन गारगोटे,

– खडकवासला : राहूल घुले, सुरेखा दमिष्ठे, अनिता इंगळे, सोपान चव्हाण, कुलदीप चरवड, किशोर धनकवडे, सचिन दोडके, नवनाथ पारगे, खुशल कंरजवणे

– कॅन्टोंन्मेंट : किशोर सरदेसाई, नीतीन रोकडे, कणव चव्हाण, नरेश पगडाल्लू

– पर्वती : अश्विनी कदम, नितीन कदम, फारूख शेख, सचिन तावरे

– कोथरूड : किशोर कांबळे, संदीप बालवडकर, स्वप्नील दुधाने

– कसबा : रविंद्र माळवदकर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button