ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी एलपीजीची स्थिती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | देशात एलपीजीच्या तुटवड्यावरून राजकीय वातावरण तापले असून, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका. कारण हे सरकार पंडीत नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधींचं सरकार नाही. गॅसचा तुटवडा राज्यासह देशभरात आहे. तरीही सरकार असं सांगत असेल की तुटवडा नाही तर ते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हेच सांगावं लागतं आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका. आत्ताचं सरकार पंडित नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधींचं सरकार नाही. एलपीजीसाठी कशा प्रकारे रांगा लागल्या आहेत ते मुंबईत, दिल्लीत बघा. पेपरमध्ये फोटो आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये प्रसाद मिळणं कमी झालं आहे. काशीमध्ये अन्नपूर्णा मंदिर आहे खूप जुनं आहे. तिथे गरीबांसाठी अन्नछत्र चालवलं जात होतं ते देखील बंद झालं आहे. तरीही सरकार म्हणतंय की एलपीजीची समस्या नाही. मुंबईत वडापावचे ठेले ५० टक्के बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये कँटीन बंद झाले आहेत. तरीही सरकार म्हणतं आहे की तुटवडा नाही. त्यामुळे दुर्दैवाने हे सांगावं लागतं आहे की सरकारवर विश्वास ठेवू नका.
हेही वाचा : गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांसाठी खरेदीची मोठी संधी
ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी एलपीजीची स्थिती आहे. मुंबई, दिल्लीत ज्या रांगा लागल्या आहेत ते काय एआय फोटो आहेत का? मुंबईतल्या रस्त्यांवरच्या ५० टक्के वडा-पावच्या गाड्या बंद झाल्या आहेत. एलपीजीचा तुटवडा आहे. देवायलयांमध्ये प्रसादांची कमतरता आहे. आपण हिंदुत्ववादी आहात, धर्मवादी आहात किमान देवळांना, शाळांना, आश्रमशाळांना तरी एलपीजी द्या, खोटं बोलू नका. वास्तव काय आहे ते सांगा. शिवाय पत्रकार परिषदा घेऊन जे सांगितलं जातं आहे त्याला काही अर्थ नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.





