‘पीएमआरडीए’च्या दहा सेवा ऑनलाइन

पुणे : नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार दहा सेवा दि. १ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आल्या आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागरिकांची शासकीय कामे घरबसल्या ऑनलाइन व्हावी, यासाठी “पीएमआरडीए’च्या माध्यमातून सेवा सुविधा ऑनलाइन करण्यात येत आहे.
शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने १० सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार; चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय
सेवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संबंधित सेवांचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, वाटप भूखंडाचे गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तांतरण करणे, वाटप भूखंडावर गृह योजनेतील सदनिकांवर वारस नोंद करणे, वाटप भूखंडावर गृहयोजना सदनिकांवर कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखला, अंतिम अग्निशमन ना हरकत दाखला