चंद्र कलाविष्कार : भारती पाटील यांच्या नजरेतून चंद्राच्या विविध कलांचे दर्शन!
गुजरात येथील 'कच्छचे रण' येथे वेगवेगळ्या वेळी टिपल्या चंद्रकला

पिंपरी-चिंचवड | चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला असा एकुलता एक उपग्रह जो रात्री आपला वाटतो त्याचा शीतल प्रकाश आणि ते चांदणं याचं साहित्य विभागांशी एक वेगळंच नातं दोन प्रेमी जीवांना तो एकमेकांना जोडणारा दुवा वाटतो. सौंदर्याचे उपमा ही चंद्राची व्यक्त पूर्ण होऊ शकत नाही .कधी बहिणीला तो भाऊ वाटतं. भाऊबीजेला जीला भाऊ नाही तिने चंद्राला ओवाळावे अशी प्रथा प्रचलित आहे आणि लहान मुलांचा तो मामा असतो. करवा चौथ, ईद, आणि हिंदू बरेच सण पोर्णिमेला आहेत. हे सगळे सण चंद्राच्या कलेशी संबंधित आहेत.
चंद्राच्या प्रथमा पासून पौर्णिमेपर्यंत वाढत जाणारा आकार आणि त्यानंतर कमी कमी होत अमावस्या हे सारं खूप सुंदर आहे. असा चंद्र नसता तर.. ना समुद्राला भरती आली असते ना प्रेमाला. अनादि अनंत काळापासून चंद्र पृथ्वीच्या सोबत आहे. तरीही त्याचे आकर्षण आणि गूढ वाटत राहते. आणि अशा चंद्रावरती जितकी गाणी लिहाल, कविता लिहाल तितक्या कमीच आहेत एवढ्या नवीन नवीन प्रतिभा देणारा तो प्रतिभा स्थान आहे. त्यामुळे तो नसता तर हा विचार करण्यापेक्षा त्याच्यावर जेवढं लिहिता येईल तेवढे कमी आहे.
हेही वाचा : राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत; खा. उदयनराजे भोसले
सदरचे छायाचित्र सौ. भारती निलकंठ पाटील यांच्या कॅमेरातून वेगवेगळ्या ठीकणाच्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आले. वेगवेगळी रूपे आपल्या समोर सादर करण्यात त्यांना यश आले. हा तांबडा चंद्र म्हणजे ‘ ब्लड मून ‘ जो गुजरात येथील ‘ कच्छचे रण ‘ या ठिकाणी दि. १४ जानेवारी पौर्णिमेच्या दिवशी काढण्यात आले. दुसरा चंद्र १५ जानेवारी ला सकाळी ८ वाजता टिपण्यात आला. व शेवटचा चंद्र ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता टिपण्यात आला.