पुणे जिल्ह्यात 10 ठिकाणी होणार नवे अग्निशामक केंद्र; पीएमआरडीएकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अर्थात पीएमआरडीए कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या सुरक्षिततेसाठी दहा ठिकाणी अग्निशामक केंद्र बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पीएमआरडीएकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रस्तावाला जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंतिम मंजूरी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यात १० ठिकाणी अग्निशामक केंद्र उभी राहणार आहेत. जिल्ह्यातील हवेली, शिक्रापूर, दौंड, मावळ, पुरंदर, मुळशी, खेड तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. त्यानुसार लोणी काळभोर, केडगावसह 10 ठिकाणी अग्निशामक केंद्र उभे राहणार आहेत. त्यासाठीच्या नव्या जागांची निश्चिती देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘भाजपाचा वक्फच्या जमिनींवर डोळा’; उद्धव ठाकरेंचा आरोप
या नवीन ठिकाणी होणार अग्निशामक केंद्र
लोणी काळभोर, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी (हवेली), शिक्रापूर (शिरूर), केडगाव (दौंड), कान्हे (मावळ), दिवे (पुरंदर), पाटण (मावळ), महाळुंगे (मुळशी), येवलेवाडी (खेड) येथे होणार आहेत. तर दौंड, खेड, मुळशी, शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा असणार समावेश असणार आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाचे बंब आणि जवान दुर्घटना भागात पोहचू शकणार आहेत.