Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

लंडनमध्ये दोन ट्रेनची समोरासमोर भीषण धडक; एका चालकाचा मृत्यू, ८० हून अधिक प्रवासी जखमी

London Train Accident | उत्तर लंडनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दोन प्रवासी ट्रेनची समोरासमोर भीषण धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका ट्रेन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, ८० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३३ प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने या घटनेला ‘मोठी आपत्ती’ (Major Incident) घोषित केले आहे.

रेल्वे ट्रॅकिंग वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ‘बेडफोर्ड’ शहराजवळ हा अपघात झाला. या दोन्ही ट्रेन दक्षिण दिशेने लंडनच्या ‘सेंट पँक्रास’ स्टेशनकडे जात होत्या. अपघात इतका भीषण होता की, एका ट्रेनचा चालक जागीच ठार झाला. नॅशनल युनियन ऑफ रेल, मेरीटाईम अँड ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे (RMT) सरचिटणीस एडी डेम्पसी यांनी मृत व्यक्ती ट्रेन चालक असल्याची पुष्टी केली आहे.

‘ईस्ट मिडलँड्स रेल्वे’ने स्पष्ट केले की, कॉर्बीहून सुटलेली ४:४० ची ट्रेन आणि नॉटिंगहॅमहून सुटलेली ३:५० ची ट्रेन यांच्यात ही जोरदार धडक झाली.

हेही वाचा

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मुंबईकरांचे हाल

हवाई रुग्णवाहिकांद्वारे बचावकार्य सुरू

ईस्ट ऑफ इंग्लंड अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील ११ प्रवासी अत्यंत गंभीर, २२ जण गंभीर जखमी आहेत, तर ५६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर) आणि विशेष आपत्कालीन पथकांची मदत घेण्यात आली. सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जखमी प्रवाशांची आणि आपत्कालीन वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे.

“एका क्षणात आम्ही पुढच्या सीटवर फेकलो गेलो!”

मागील ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या पीटर नॅप नावाच्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. “कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक हा अपघात झाला. एका क्षणात आम्ही पुढच्या सीटवर फेकले गेलो आणि सर्वत्र धूर पसरला. लोक भीतीने ओरडत आणि रडत होते. मी जेव्हा उठून पाहिले, तेव्हा अनेकांचे पाय फ्रॅक्चर झाले होते, तर काही जण धक्क्यामुळे बोलण्याच्या स्थितीतही नव्हते,” असे पीटर यांनी सांगितले.

रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत

या अपघातामुळे सेंट पँक्रास स्टेशनकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील वेळापत्रकाबाबतही अद्याप अनिश्चितता आहे. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे युनियनने तीव्र चिंता व्यक्त केली असून, या दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर कशा आल्या, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button