Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार

पुणे | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या काळात कार्यरत डॉक्टर्स, वैद्यकीय संघटना, कोरोनावर मात करणारे डॉक्टर्स यांचा सत्कार करण्यात करण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे निधन पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नावे सुचविण्याचे आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी केले आहे. यासंदर्भात डॉ हेमंत तुसे, डॉ राहुल सूर्यवंशी यांच्याशी १५ जानेवारी पर्यंत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button