न्यू यॉर्कमध्ये ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंडचं’ आयोजन
भारताच्या समृद्ध कलाकृती आणि संस्कृतीचं जगाला दर्शन

राष्ट्रीय : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) कडून ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड’ या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरामध्ये 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये भारताच्या समृद्ध कलाकृती आणि संस्कृतीचं जगाला दर्शन होणार आहे. लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संगीत, नाट्य, फॅशन, पाककृती अशा विविध भारतीय कलाकृतीचं प्रदर्श करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाबाबत बोलताना एनएमएसीसीच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी म्हटलं की, “नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड पहिल्यांदाच न्यू यॉर्क शहरात आयोजित करण्यात येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध कलाकृती ज्यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन, पाककृती अशा विविध कला सादर करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
जगातील सर्वोत्तम कलाकृतींचं भारतात प्रदर्शन करणे आणि भारतातील सर्वोत्तम कलाकृती जगासमोर आणणं हाच ‘NMACC’ चा मुख्य उद्देश आहे. हा विशेष वीकेंड या प्रवासातील पहिलं पाऊल ठरणार आहे. जगातील एक प्रतिष्ठित स्टेज असलेल्या लिंकन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. न्यू यॉर्क शहर आणि जगासोबत आमच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचा वारसा शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे.’असं या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.
12 सप्टेंबर रोजी डेव्हिड एच. कोच थिएटरमध्ये भारतातील सर्वात भव्य नाट्यनिर्मिती असलेल्या ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ या बहुप्रतिक्षित अमेरिकन प्रीमियरने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. फिरोज अब्बास खान यांनी हे दिर्गदर्शित केलं आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून, भारतातील विविध कालाकृती आणि संस्कृतीची या निमित्ताने जगाला ओळख होणार आहे. यामध्ये संगीत, नृत्यू, फॅशन, अशा विविध कला कलांचा समावेश आहे.