ताज्या घडामोडीपुणे

शरद पवार यांनी घातली पुणेरी पगडी; राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी आज ‘जितो कनेक्ट २०२२’  या कार्यक्रमात पुणेरी पगडी  घालून स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे पुणेरी पगडीने कोणाचेही स्वागत करू नका, स्वागत करायचेच असेल तर महात्मा फुले यांच्या फुले पगडीने स्वागत करा, असा आदेश दस्तुरखुद्द शरद पवारांनीच दिला होता. आजचा हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचा नसला, तरी पक्षाच्या कार्यक्रमात ज्या पगडीला विरोध दर्शविण्यात आला, तीच पगडी पवार यांनी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चा ऐकायला मिळत आहे.

सन २०१८ मध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी छगन भुजबळ यांना फुले पगडी घातली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेशच दिला होता. त्यानंतर पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद बरेच दिवस राज्यभर गाजत होता. आता पवार यांनी पुणेरी पगडी घातल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात आयोजित ‘जितो कनेक्ट २०२२’ कार्यक्रमातील ‘प्राईड ऑफ पुणे’ सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्याची घोषणाच पवारांनी त्यावेळी केली होती.

तुरुंगातून सुटल्यानंतर याच सभेत छगन भुजबळ यांनी पहिले भाषण केले होते. त्यांच्या भाषणात जात, धर्म, समाज यांना सोबत घेऊन जाऊ असे भुजबळांनी म्हटले होते. त्यानंतर पवारांनी गुगली टाकत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी नको असा हुकूमच देऊन टाकला होता. आता पवारांनी पुणेरी पगडी स्वीकारल्यानंतर हा वाद पुन्हा डोके वर काढणार असे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button