ताज्या घडामोडीमुंबई

उद्धव ठाकरे एका महिलेला घाबरले, त्यामुळं आमच्यावर सक्तीची कारवाई – रवी राणा

मुंबई|मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका महिलेला घाबरले, म्हणून त्यांनी आमच्यावर ही कारवाई केली, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीये. तसेच, न्यायालयाच्या निर्णयावरही संजय राऊतांनी आक्षेप घेतला. संजय राऊत हे चवन्नी छाप आहेत. संजय राऊतांना हा अधिकार कोणी दिलाय, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

“पोलिसांनी आम्हाला जामीन देणार म्हणून पोलीस ठाण्यात नेलं. तिथे त्यांनी आम्हाला चहा दिला. त्यानंतर रात्री १२ नंतर सांताक्रुझ जेलमध्ये आम्हाला टाकलं. त्याठिकाणी पाणी दिलं नाही, बाधरूम वापरू दिलं नाही, पंखा सुद्धा नाही, चटई सुद्धा दिली नाही. आम्ही ५ वाजेपर्यंत चटई आणि पंखा, पाण्यासाठी मागणी करत होतो. एका महिलेचा इतका छळ करणे, उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारची सक्तीची कारवाई आमच्यावर केली”.

“न्यायालयाच्या निर्णयावरही संजय राऊतांनी आक्षेप घेतला. संजय राऊत हे चवन्नी छाप आहेत. संजय राऊतांना हा अधिकार कोणी दिलाय, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे”.

“हनुमानाचं नाव घेतल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. १४ आम्हाला जेलमध्ये ठेवणाऱ्या या मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल. जे रावणाचं झालं तेच मुख्यमंत्र्यांचं होणार आहे. हनुमान आणि रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”, असा इशाराही रवी राणा यांनी दिला.

“दोन लहान मुलं आणि वृद्ध आई-वडील घरात होते. शिवसेना कार्यकर्ते घरावर दगडफेक करत होते. त्यांच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवर कारवाई करायला हवी. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारावई करावी. दिल्लीला जाऊन आम्ही ही मागणी करणार”, असं रवी राणा म्हणाले.

फ्लॅट काय ते आम्हालाही मारू शकतात – रवी राणा

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरात अवैध आणि चुकीचं बांधकाम केलं असल्याचा आरोप करत त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रवी राणा म्हणाले, “आम्ही तुरुंगात असताना आमच्या घरावर दो-तीनवेळा नोटीसी लावल्या. सुडाचं राजकारण करत आम्हाला त्रास देण्यासाठी ही एकतर्फी कारवाई आमच्यावर होत आहे. मी गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेची वाट पाहात आहे, की या फ्लॅट बघून घ्या, मोजून घ्या कारण ती इमारत मी बांधलेली नाही. अनेकांनी त्याठिकाणी फ्लॅट घेतले. तसं आम्हीही इथे फ्लॅट घेतला आणि महापालिकेनेच त्याची परवानगी दिलीये. शिवसेनेच्या महापौरांनी मान्यता दिलीये. मान्यता देणारेच जर दबावाखाली येऊन कारवाई करत असतील तर हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे”.

“ही इमारत गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधलेली आहे आणि बिल्डरकडून आम्ही फ्लॅट घेतलाय. मी कुठलाही इमारत बांधली नाही. मी बिल्डर नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एखादा फ्लॅट जर आम्ही मुंबईत घेतलाय आणि मुख्यमंत्र्यांना द्वेषाच्या राजकारणातून तो तोडायचा असेल, तर मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत, त्याच्याकडे पावर आहे, ते कुठल्याही प्रकारची कारवाई आमच्यावर करू शकतात. जर ते आम्हाला खोट्या केसवरून तुरुंगात टाकू शकतात तर ते आमचा फ्लॅट काय आम्हालाही मारू शकतात आमच्यावरही हल्ला करू शकतात. त्यांच्याकडील अधिकाराचा ते दुरूपयोग करणार आहेत. मात्र, आम्ही त्यांना सहकार्य करू”.

“संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जी चौकशी केंद्रात प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि आमच्या न्यायासाठी आम्ही दिल्लीला मागणी करू”, असंही ते म्हणाले.

बारा दिवसानंतर भेट; जेलमधून बाहेर आलेल्या रवी राणांना पाहून नवनीत राणांना रडू आवरेना

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button