ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘माऊथ ऑर्गन’ मैफिलीच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

प्रसिद्ध माऊथ ऑर्गन वादकास शिष्यांकडून अनोखी मानवंदना

पुणे : सुप्रसिद्ध ‘माऊथ ऑर्गन’ वादक आणि गुरुवर्य शामकांत सुतार यांच्या शिष्यांनी नुकताच माऊथ ऑर्गन मैफिलीचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याला संगीतप्रेमी पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

‘मेलडीज ऑफ माऊथ ऑर्गन’ संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा विनामूल्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुतारसरांनी घडवलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असणारे अनेक प्रथितयश शिष्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी मराठी आणि हिंदी गाण्यांचा नजराणा पेश करून आपल्या गुरूंना एक प्रकारचा मानाचा मुजरा केला.

हेही वाचा – महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती २३ कोटी, ADR च्या अहवालातून स्पष्ट

सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. बोकील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संदीप पंचवाटकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सुतारसरांचे सर्व शिष्य तसेच डॉ. दशमीत सिंग डॉ. सुप्रिया गाडेकर आणि शेकडो रसिकांनी दाद दिली. स्वतः शामकांत सुतार यांनीही नव्या आणि जुन्या गाण्यांचा अफलातून खजिना रसिकांपुढे खुला केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button