breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे हादरले! पत्नीसह एका वर्षाच्या मुलाची हत्या, पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे – बेरोजगारीने ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. 28 वर्षीय पत्नी आणि आपल्या एक वर्षीय चिमुकल्याची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची भयानक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेरोजगारीला कंटाळून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे हा पत्नी व मुलासोबत अनेक वर्षांपासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. मात्र काम नसल्याने अनेक दिवसांपासून तो तणावात असायचा. याबाबत पत्नी प्रज्ञा हिने हनुमंतच्या नातेवाईकांना त्याला समजून सांगण्यास सांगितले होते. परंतु दुर्दैवी घटना घडलीच. ९ मे रोजी सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास हनुमंतने पत्नी प्रज्ञाची गळा दाबून हत्या केली, शिवतेजचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button