breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला लूक आऊट नोटीस

नवी दिल्ली – ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू सागर राणाच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथके रवाना झाली आहे. परंतु सागर राणाच्या मृत्यूनंतर सुशीलकुमार हा फरार आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरावर छापा टाकला होता. आता तो देश सोडून जाऊ नये म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असून देशाच्या सर्व विमानतळांवर ही माहिती देण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर राणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचे म्हटले जात होते. त्याचे अखेरचे मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडले आहे. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दहा आरोपींची ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात सुशील कुमारचे सासरे आणि द्रोणाचर्च पुरस्कार विजेते सतपाल सिंह तसंच मेहुणार लव सहरावत यांची अनेक तास चौकशी केली होती. पोलिसांनी सुशील कुमारच्या सासऱ्यांकडे त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांबाबत विचारणा केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. तसेच दिल्ली, उत्तराखंड, हरियाणात सुशीलकुमारला पकडण्यासाठी छापेमारी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button