breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेकडून निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर

पुणे – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. आयोगाच्या परवानगीनंतर पालिका हा रचनेचा आराखडा लवकरच जाहीर करणार आहे. नंतर प्रभाग रचना आणि आरक्षणांच्या सोडतीवर हरकती सूचना मागविण्यात येतील. या हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. पुणे महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश झाला असून, त्यानुसार महापालिकेस संपूर्ण प्रभाग रचना नवीन हद्दीच्या समावेशासह करावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनास वेळ लागणार आहे.

हे काम वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याने महापालिकेने प्रभाग रचनेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ आयोगाकडे मागितली होती. अखेर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संभाजीनगर महापालिकेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाने दिली होती. त्यानुसार ही प्रभाग रचना आज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. नगरसेवकांची संख्या १७३ असून, तीन सदस्यांचे ५७, तर दोन सदस्यांचा एक अशी एकूण ५८ प्रभागांची रचना आहे.

हा कच्चा आराखडा निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे. त्यात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यात येणार आहे, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर पालिका हा प्रभाग रचनेचा आराखडा येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणांच्या सोडतीवर हरकती सूचना मागविण्यात येतील. या हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button