breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणे तापलं! जिल्ह्यातील ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पुणे : राज्यातील वातावरणातील उष्णता पाहता पुढील काही दिवस कमालीचे तापमान राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार पुण्यात उष्णतेचा पारा ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्याकडून सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोरेगाव पार्क, मगर पट्टा या भागात उच्च तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेर येथे देखील उच्च तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – Pune-Nashik highway : ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’द्वारे पुणे-नाशिक महामार्गाला ‘गती’

आज पुणे जिल्ह्यातील ४२ अंश तापमानाचे निरीक्षण केल्याने हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगशी लढा देण्याची तातडीची गरज आहे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्यावर दिलेली सामूहिक जबाबदारी ओळखून एक समाज म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकत्रितपणे, आपण महत्त्वपूर्ण फरक करू शकतो, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button