breaking-newsराष्ट्रिय

भूकंप आणि त्सुनामी येण्याआधी त्याचा अंदाज मिळण्यासाठी Googleची नवी योजना

नवी दिल्ली : भूकंप आणि त्सुनामीचा अंदाज बांधू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा गूगलने काही वर्षांपूर्वी प्रयोग सुरु केल्याचा दावा, गूगल Google आणि अल्फाबेटचे Alphabet मुख्य कार्यकारी अधिकारी CEO सुंदर पिचाई sundar pichai यांनी केला आहे. कंपनी यासाठी समुद्राच्या आतल्या फायबर केबल्सचा वापर करणार असल्याचं बोललं जात आहे. या केबल्स भूकंप आणि त्सुनामी येण्याच्या आधी याचा अंदाज बांधू शकतात. तसंच याचा एक वॉर्निंग सिस्टम म्हणूनही वापर केला जाऊ शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या ऑप्टिकल फायबर केबल्सचा वापर 100 किमीपर्यंतच्या क्षेत्रात कोणत्याही हालचाली समजण्यासाठी केला जाऊ शकतो. गूगलनुसार, ‘समुद्राच्या पृष्ठभागावरील कोणत्याही हालचाली ओळखण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या फायबर केबल्सचा उपयोग करण्यात येत आहे.’ कंपनीने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘जगभरात बहुतांश फायबर ऑप्टिक सिस्टमकडे उपलब्ध असणाऱ्या, उपकरणांवर आमचं हे तंत्रज्ञान अवलंबून आहे, जेणेकरुन ते विस्तृतपणे लागू केलं जाऊ शकतं.’ 

गूगलनुसार, हे ऑप्टिकल फायबर्स समुद्राच्या पृष्ठभागावरुन वेगवेगळ्या खंडांना जोडू शकतात, ज्याद्वारे बहुतांश इंटरनेट ट्रॅफिकही जातं. या केबल्स ऑप्टिकल फायबर्सपासून बनलेल्या असतात, ज्या डेटा ‘लाईट पल्स’च्या रुपात 204, 190 किमी प्रति सेकंद वेगाने घेऊन जातात. या केबल्स जेथे पोहचतात तेथील कमतरता सुधारण्यासाठी डिजिटल सिग्नल प्रोसेसरचा वापर केला जातो. ऑप्टिकल ट्रान्समिशनचा एक भाग म्हणून जेव्हा त्यांचा मागोवा घेतला जातो, त्यावेळी प्रकाश ध्रुवीकरण (SOP) स्थितीत असतो. गूगलच्या मते, ‘केबलसह असलेल्या यांत्रिक अडथळ्यांना प्रतिसाद म्हणून SOPमध्ये बदल होतात, या अडथळ्यांचा मागोवा घेतल्यास भूकंपाच्या हालचाली पकडण्यास मदत होते.’

गूगलने हा प्रोजेक्ट 2013 मध्ये सुरु केला होता. आणि याचा पहिला प्रयोग 2019 मध्ये केला होता. तेव्हापासून या तंत्रज्ञानाने मेक्सिको आणि चिली येथे हलक्या भूकंपांचा अंदाज वर्तवला आहे. हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या अंमलात आणल्यास लाखो लोकांचे जीव वाचवण्यास मदतशीर ठरु शकतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button