breaking-newsताज्या घडामोडी

औरंगाबादच्या डीएचओवर बदनापूर पोलिसांची कारवाई

बदनापूर | औरंगाबादचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते (४३) यास शासकीय वाहनातून रोख रकमेसह विदेशी दारू घेऊन जालन्याकडे जाताना वरुडी चेकपोस्टवर पोलिसांनी शनिवारी दुपारी १.३० वाजता पकडले.

दरम्यान, वाहनाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम व विदेशी दारूबद्दल विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, प्राथमिक चौकशी करून त्याची नोटिसीवर सुटका करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे इर्टिगा कार (एमएच २० सीयू ०३५३) मधून हवाल्याची मोठी रक्कम अौरंगाबादहून जालन्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बदनापूर हद्दीतील चेकपोस्टवर कार अडवून चालक हिरालाल आसाराम शेजवळ व डॉ. अमोल गिते याची विचारपूस करण्यात आली.

त्यानंतर कारची झडती घेतली असता त्यात सहा लाख ७० हजार रुपये रोख, ६ हजारांची विदेशी दारू सापडली. दरम्यान, ही रक्कम वडिलांची असून दारूसुद्धा त्यांच्यासाठीच घेऊन जात असल्याची उडवाउडवीची उत्तरे देऊन डॉ. गिते याने पोलिसांना समाधानकारक माहिती दिली नाही. यामुळे पंचनामा करून कारसह रोख रक्कम व विदेशी दारू असा एकूण १२ लाख ७६ हजारांचा माल पाेलिसांनी जप्त केला. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पीएसआय शिवसिंग बहुरे यांनी तक्रार दिली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ढिल्पे करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button