TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुण्यातील एटीएस कार्यालयाबाहेर काँग्रेसचे निदर्शन

पुणे ः
प्रदीप कुरुळकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप करत शुक्रवारी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने विशेष न्यायालयात 1,835 पानांचे आरोपपत्र दाखल करून डीआरडीओचे तत्कालीन संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. त्या आरोपपत्रात प्रदीप कुरुळकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने पुणे एटीएस कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, डीआरडीओचे वरिष्ठ संचालक प्रदीप कुरुळकर यांनी आपल्या देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना दिली आहे. देशाचा विश्वासघात करणाऱ्या प्रदीप कुरुळकर यांच्यावर एटीएस गुन्हा दाखल करेल, अशी अपेक्षा होती. एवढा जघन्य गुन्हा करूनही देशद्रोहाचा गुन्हा का दाखल झाला नाही? हा प्रश्न आपल्यासह प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदीप कुरुळकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. या मागणीसाठी पुणे एटीएस कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. एटीएसने या मागणीची दखल घेऊन तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा. अन्यथा याविरोधात जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button