breaking-newsराष्ट्रिय

१२ वर्षीय मुलीला शबरीमला मंदिरात नाकारला प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिला असतानाही केरळ पोलिसांनी १२ वर्षीय मुलीला शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याचं समोर आलं आहे. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणारी फेरविचार याचिका सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंबंधीच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिली नाही. २८ सप्टेंबर २०१८ रोजी बहुमताने दिलेला हा निकाल घटनापीठाच्या पुढील निकालापर्यंत कायम राहणार आहे. असं असतानाही १२ वर्षीय मुलीला पोलिसांनी प्रवेश नाकारल्याचं समोर आलं आहे.

शनिवारी शबरीमला मंदिराचे दरवाजे पहिल्यांदाच उघडल्यानंतर दहा महिलांना पोलिसांकडून प्रवेश नाकारत रोखण्यात आलं होतं. तर सोमवारी दोन महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. ही प्रकरणं ताजी असतानाच आता १२ वर्षाच्या मुलीला रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगी आपल्या कुटुंबासोबत मंदिराला भेट देण्यासाठी आली होती.मुलगी आपले वडील आणि नातेवाईकांसोबत शबरीमला मंदिरात दर्शनासाठी आली होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना रोखण्यात आलं. यावेळी त्यांना वयाचा पुरावा देण्याची मागणी करण्यात आली. आधार कार्ड तपासलं असता पोलिसांनी मुलीला पम्बा गार्ड रुमच्या पुढे जाऊ दिलं जाऊ शकत नाही असं सांगितलं.

कुटुंबाने पोलिसांकडे मुलीला परवानगी दिली जावी यासाठी विनंती केली, मात्र पोलिसांनी मुभा दिली नाही. यानंतर मुलीला जोपर्यंत नातेवाईक आणि वडील दर्शनाहून परत येत नाहीत तोपर्यंत एका खोलीत वाट पाहण्यास सांगण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button