breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लोणावळ्यात महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांची रेकाॅर्डबेक्र रॅली

  • प्रचाराला तरुणांसह महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

लोणावळा – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यानी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत लोकांशी जनसंर्पक साधत प्रचारात झंझावात सुरु आहे.  लोणावळामध्ये राष्ट्रवादी-काॅंग्रेस महाआघाडीच्या वतीने आज (रविवारी) काढलेल्या रॅलीला तरुणांनी रेकाॅर्डबेक्र गर्दी केली होती. तसेच त्यांच्या प्रचारालाही तरुणांसह महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोणावळा शहरातील भगवान महावीर चाैकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. लोणावळातील छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. पार्थ पवार यांनी आज सकाळपासून देहुरोड येथून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर विकासनगर, मामुर्डी, चिंचोली, झेंडेमळा, काळोखेमळा, खिलई, शेलारवाडी असा प्रचाराचा झंझावात प्रचार दाैरा केला. त्यानंतर पार्थ पवारांचा ताफा लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. लोणावळ्यात त्याच्या रॅलीला रेकाॅर्डबेक्र गर्दी झाली होती. शहरातील भगवान महावीर चाैकातून रॅलीला सुरुवात करुन व्हीपीएस हायस्कूल मार्गावरुन रॅलीचा ताफापुढे आगेकूच झाला.

मावळा पुतळा चाैक, एमजी रोड, लोणावळा रेल्वे स्थानक या मार्ग दुचाकी रॅली मोठ्या जोमाने पुढे जात होती. गवळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पार्थ पवारांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर एलटीरोड येथील महात्मा जोतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच एलटी रोड येथील महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी आंबेडकर जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व भीम सैनिकांना पार्थ पवार यांनी जय भीम-जय भीम असा जयघोष करुन आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर वॅक्स म्युझियम येथील पार्थ पवार जनसंपर्क कार्यालयातील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मित्रपक्ष महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button