breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

पुणे- शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.

विनायक निम्हण यांना औंध जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे समोर आले. अंत्यविधी रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली…

पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार,राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सहकारी विनायक निम्हण यांचं निधन हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. पुण्याच्या विकासात दीर्घकाळ सोबत काम करणारा चांगला सहकारी आज गमावला आहे. निम्हण कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निम्हण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button