breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल ः आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भावना गवळी, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांसह अनेकांना सरकार स्थापन करण्यापूर्वी किरीट सोमय्या माफिया-माफिया असे बोलत होते. मात्र, त्यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. तसेच, त्यांची चार्जशिट कधी दाखल होणार, याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावे, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला.

भावना गवळी, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांसह अनेकांना सरकार स्थापन करण्यापूर्वी किरीट सोमय्या माफिया-माफिया असे बोलत होते. मात्र, त्यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. तसेच, त्यांची चार्जशिट कधी दाखल होणार, याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावे, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, “किरीट सोमय्यांचे सध्या आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू असे झाले”, असा खोचक टोलाही लगावला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत तरुंगातून बाहेर आले. त्यांनतर संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांच्या भेटीनंतर सुषमा अंधारेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी “योगा योग असा होता की संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली आणि मी पक्षात आली. संजय राऊत यांना तरुंगात जसे 102 दिवस झाले होते, तसे मला 102 दिवस पक्षात झाले. त्यामुळे माझी संजय राऊत यांच्यासोबत भेट झाली नव्हती, म्हणून आज त्यांची भेट घेतली. त्यामुळे लांब पल्ल्याची जी तोफ आहे. या तोफेकडून मला काही टीप्स मिळतात का, मी अजून चांगल्याप्रकारे कसा विरोधकांवर तोफ गोळा चालवू शकते, यासाठी एका गुरूतुल्य व्यक्तीमत्वाकडून टीप्स घेतल्या. आजची फार उर्जादायी अशी भेट होती”, असे सांगितले.

“भविष्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचे पाहायला मिळेल. तसेच, आता ठाकरे गटाची ताकद आणि उर्जा दोन्ही वाढली आहे. एक उमेद वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने निरिक्षण नोंदवले की, ही अटक बेकायदेशीर होती आणि कदाचीत अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची आणि सूडबुद्धीने वागण्याची ईडीची पद्धत आहे. ईडीचा जो ‘रेट ऑफ कन्व्हीक्शन’ अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे. मग ईडी कशीसाठी आहे, फक्त राजकीय हेतूने आणि सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी आहे का? किवा ईडीची खरंच आता गरज आहे का? यावर आता चर्चा, संशोधन आणि सभागृहांमधून प्रश्न विचारण्याची गरज आहे”, असेही सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटले.

“जी लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीचा आणि गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ती लोक बीकेसी मेळाव्यामध्ये जो करोडो रुपयांचा चुराडा केला. त्याचा हिशोबा का मागत नाही”, असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी भाजपावर निशाणा साधला. यावेळी भाजपावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी माजी खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. “किरीट सोमय्या हे लांब पल्ल्याचा रस्ता गाठून अनिल परब यांच्या बंगल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेत. पण मुंबईतील नारायण राणे यांच्या आधीश बंगल्यावर हातोडा घेऊव कधी जाणार?, तुम्ही इतरांना हिशोब विचारत आहात, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना कधी प्रश्न विचारणार”, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यावरही सुषमा अंधारेंनी प्रश्न उपस्थित केला. “जो पक्षीची अद्याप नोंदणी झाली नाही. त्या मेळाव्याचा खर्च कोणी केला, याचे उत्तर किरीट सोमय्या कधी देणार, किंवा सोमय्या याची चौकशी करणार का”, असाही सवाल त्यांनी उपस्थित करत सोमय्यांवर निशाणा साधला. शिवाय, ”भावना गवळी, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांसह अनेकांना सरकार स्थापन करण्यापूर्वी माफिया-माफिया असे बोलत होता. त्यांना क्लीन चिट अद्याप मिळालेली नाही. त्याची चार्जशिट कधी दाखल होणार, याचे किरीट सोमय्या यांनी उत्तर द्यावे. किरीट सोमय्यांचे सध्या आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू असे झाले आहे”, असा खोचक टोला सोमय्यांना लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button