पिंपरी / चिंचवड

फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून कार पळवली

पिंपरी l प्रतिनिधी

फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून तीन अनोळखी व्यक्तींनी एका व्यक्तीची कार जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना 23 डिसेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता तळवडे येथे घडली.

सतीश पद्माकर खराटे (वय 35, रा. रुपीनगर, चिखली. मूळ रा. बुलढाणा) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात 5 मार्च 2022 रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी खराटे चाकण येथून रुपीनगर येथे घरी जात होते. सात वाजताच्या सुमारास अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्या कारला आडवी लावली आणि अडवले. आरोपी हे श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्मचारी आहेत, असे आरोपींनी भासवले. त्यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने कार मधून ओढून हाताने मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादी यांची तीन लाख रुपये किमतीची टोयोटा इटीयोस कार (एम एच 28 / आर 3496) जबरदस्तीने चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button