आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

तूरडाळ शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे

डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर होणारे परिणाम

मुंबई : डाळ ही अत्यंत पौष्टिक असून, याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डाळीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत; पण विशेष म्हणजे तूरडाळ शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे; पण जर हीच डाळ एक महिन्यासाठी आहारातून काढून टाकली, तर काय होईल? द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. के सोमनाथ गुप्ता सांगतात, “आपल्या चांगल्या निरोगी आरोग्यासाठी प्रोटीन्सची अत्यंत आवश्यकता असते; पण आहारात एक महिना डाळ नसेल, तर प्रोटीन्स मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो. विशेषत: शाकाहारी लोकांसाठी हे खूप मोठे आव्हान ठरू शकते.”

डाळ खाण्याचे फायदे जाणून घ्या
प्रोटीनयुक्त वनस्पतींवर आधारित पदार्थ : स्नायू मजबूत ठेवण्यासाठी डाळ ही अत्यंत महत्त्वाची असून, शाकाहारी लोकांसाठी ती अत्यंत फायदेशीर आहे.

आतड्याच्या आरोग्यासाठी फायबर गरजेचे : डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनास मदत करते. त्याशिवाय यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहते.

जीवनसत्त्वे आणि खनिजे : डाळींमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम व जीवनसत्त्वे असतात; जी डाळीला अधिक पौष्टिक बनविण्यास मदत करतात.

रक्तातील साखरेचे नियंत्रण : डाळीमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कर्बोदके पचायला वेळ घेतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

हृदयाचे आरोग्य : नियमित डाळीचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते; ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रण : डाळीमध्ये प्रोटन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात राहतात; ज्यामुळे वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

हाडे मजबूत होतात : डाळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात; जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

महिनाभर डाळीचे सेवन न केल्यास आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात? डॉ. गुप्ता यांनी याविषयी माहिती सांगितली आहे.
प्रोटीन्सची कमतरता : जे लोक शाकाहारी आहेत, त्यांना प्रोटीन्ससाठी डाळींवर सर्वांत जास्त अवलंबून राहावे लागते. डाळीच्या अभावामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा त्यांना अशक्तपणा जाणवू शकतो.

पचनाशी संबंधित समस्या : फायबरचे सेवन कमी केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास आणि पचनाशी संबंधित समस्या उदभवू शकतात.

पौष्टिक घटकांची कमतरता : डाळीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. डाळीचे महिनाभर सेवन केले नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो.

डॉ. गुप्ता सांगतात, “डाळीचे सेवन न केल्याने त्याचा परिणाम थेट तुमच्या आहार, जीवनशैली व आरोग्यावर होऊ शकतो. शाकाहारी लोक टोफू, सुका मेवा, बिया व शेंगा यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ पर्याय म्हणून खाऊ शकतात.” ते पुढे सांगतात, “आहारात कोणतेही बदल करताना त्याबाबत जवळच्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे.”
डॉ. गुप्ता यांनी दररोज १/२ ते ३/४ कप शिजविलेल्या डाळीचे आहारात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

डाळ ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही एक महिन्यासाठी डाळीचे सेवन कमी करण्याचा निर्णय घेत असाल, तर त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर स्रोतांचा आहारात समावेश करण्याचा विचार करा. संतुलित आहार आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button