ताज्या घडामोडीमुंबई

अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत दगडफेक

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेमध्ये दगडफेक झाली. माजी आमदार विद्या चव्हाण यांचे भाषण सुरू असताना दगडफेक झाली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इतरांची सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात आनंद नगर रिक्षा थांब्याजवळ अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास सभा सुरू होती. माजी आमदार विद्या चव्हाण यांचे भाषण सुरू असताना अज्ञात व्यक्तीने व्यासपीठाच्या दिशेने दगड फेकला. याबाबत प्रशांत कदम यांनी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३३६ (इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये कोणीही जखमी झाले नसून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यात आली आहे. त्याद्वारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button