breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड येथील विद्यानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये कोयते, तलवारीने एकमेकांवर हल्ला केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी विक्रम भंवरसिंग राजपूत (वय 22, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिफाना स्पेशल काळे, करण स्पेशल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, किरण स्पेशल काळे व गब्बर पवार (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.31) रात्री अकराच्या सुमारास आरोपी तिफाना काळे ही फिर्यादी विक्रम यांच्या घरासमोर आली. “तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले’ असा प्रश्न केला. त्यावर विक्रम यांनी आम्ही दगड मारले नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी तिफाना यांनी तू घराबाहेर ये बघतेच तुला असा दम भरला.

फिर्यादी विक्रम आरोपीच्या पाठीमागून त्यांच्या घराजवळील खदाणीजवळ गेले त्यावेळी आरोपीची दोन मुले व आणखी एकजण हातात लोखंडी कोयता घेऊन उभे होते. फिर्यादी याठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत कोयत्याने त्याच्यावर वार केले. मात्र, फिर्यादी यांनी ते चुकवले, फिर्यादी यांचा बचाव करण्यासाठी तिथे आलेला त्यांचा भाऊ व भावाचा मित्र यांना देखील आरोपीने कोयत्याने मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी तसेच त्यांच्या भावावर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

तसेच याप्रकरणी तिफाना स्पेशल काळे (वय 48, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनीही पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भंवरसिंग रजपूत, अंकुर आजेशाने पवार, रोहित कुरमे, अक्षय काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आकाश भंवरसिंग रजपूत याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी तिफाना यांच्या घरावर गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास दगड पडू लागल्याने त्या व त्यांचे पती स्पेशल काळे हे बाहेर येऊन शिवीगाळ करायला लागले. यावेळी त्यांनी चार आरोपींना तिथून पळून जाताना पाहिले. आरोपी विक्रम व आकाश हातात तलवार आणि कोयता घेऊन फिर्यादीच्या पतीच्या अंगावर धावून गेले. आरोपी विक्रमने हातातील कोयता तिफाना यांच्या डोक्‍यात मारला. त्यानंतर फिर्यादी यांची मुले या भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले. आरोपींना यांच्यावर देखील वार करत त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button