breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संपूर्ण देश भाजपसोबत आहे’, – प्रविण तरडे

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

‘मुळशी पॅटर्न’फेम अभिनेता प्रविण तरडे याला भाजप समर्थनार्थ पोस्ट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ‘संपूर्ण देश भाजपसोबत आहे’, अशी फेसबुक कमेंट केल्याने प्रविण तरडेला नेटिझन्सने चांगलंच ट्रोल केलंय.

संपूर्ण देशभर जेएनयूतील हल्ल्याचा मुद्दा गाजत असताना प्रविण तरडे यांनीही यात उडी घेतली. पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहीली होती. ‘एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा’, असं त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलं. परुळेकरांच्या या पोस्टवर अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यानं ‘संपूर्ण देश भाजपासोबत’, अशी कमेंट केली. या कमेंटवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार सुरू झाला आहे. तरडेंच्या कमेंटवर आतापर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात तरडेंचा समाचार घेणाऱ्या सर्वाधिक प्रतिक्रिया आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button