Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप’; मंत्री अतुल सावे

मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करावा. वनार्टीचा रोडमॅप युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली वनार्टीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीस सहसचिव सुनील तुंबारे, वनार्टीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे तसेच संचालक मंडळातील सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, महाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी,  स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेती व उद्योग क्षेत्रात ३५० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.

हेही वाचा –  आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरण, लेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत संस्थेच्या विविध योजनांना मंजुरी देताना चालू आर्थिक वर्षासाठी तसेच, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी करार करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासही मान्यता देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button