Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कणकवलीत राणे पुत्रांच्या राजकीय संघर्षात ‘शहर विकास आघाडी’चा झेंडा; १८ वर्षांनंतर संदेश पारकर पुन्हा नगराध्यक्ष!

सावंतवाडी : कणकवली नगरपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर शहर विकास आघाडीने बाजी मारली आहे. आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपच्या समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची माळ दुसऱ्यांदा आपल्या गळ्यात पाडली. विशेष म्हणजे, तब्बल १८ वर्षांनंतर पारकर पुन्हा एकदा या पदावर विराजमान झाले आहेत.

​या निवडणुकीत महायुती न झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली होती. भाजपचे नेतृत्व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे करत होते, तर दुसरीकडे राणेंच्या तालमीत तयार झालेले त्यांचेच सुपुत्र आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकला होता. निलेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या साथीने ‘शहर विकास आघाडी’ची मोट बांधली. ​या आघाडीत शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ‘भय आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली’चा नारा दिला होता.

नगराध्यक्ष: संदेश पारकर (शहर विकास आघाडी) – विजयी. ​भाजप: ९ नगरसेवक. ​शहर विकास आघाडी: ८ नगरसेवक विजयी झाले. ​नगरसेवकांच्या संख्येत भाजप वरचढ ठरली असली तरी, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत संदेश पारकर यांनी बाजी मारून पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा –  डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशनचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश

संदेश पारकर जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले होते, तेव्हा नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही त्यांनी राणेंना धक्का दिला होता. आता १८ वर्षांनंतर ते पुन्हा नगराध्यक्ष झाले असताना, नितेश राणे पालकमंत्री आहेत, मात्र यावेळी पारकर यांना निलेश राणेंची साथ लाभली हे विशेष.

​संदेश पारकर हे निवडणूक लढवताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, आता विजयानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या शब्दाला मान देऊन ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील होणार का? याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकास आणि जनसेवा हीच गोष्ट लक्षात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button