Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशनचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश

उद्योगाभिमुख शिक्षणातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरची दिशा

पुणे : डॉ. सुशांत पाटील ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन या महाविद्यालयाने कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न व एआयसीटीई मान्यताप्राप्त असलेल्या या संस्थेतील विद्यार्थ्यांची थिंक टेक इंडिया या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि एआय-डीएस (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स) विभागातील एकूण १३ विद्यार्थ्यांची वार्षिक ५.५ लाख रुपये पॅकेजसह तसेच १५ हजार रुपये मासिक स्टायपेंडवर निवड झाली आहे. हे यश महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील वैष्णवी देसाई, साक्षी आढाव, दीक्षा देशमाने, ज्योती जाधव, प्रीतम कुमार, शिवम कुमार, विनोद कुमार, मोहन कडमबांडे, जयेश पाटील आणि महेश सुभम यांचा समावेश आहे. तर एआय-डीएस विभागातील ओम बाम्बळे, वेदांत चौधरी आणि ऋतुजा पाटील या विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे.

हेही वाचा –  लेखक संजय दुधाणेंच्या पुस्तकांचा रौप्यमहोत्सवी विक्रम

या यशामागे संस्थेचे मार्गदर्शक डॉ. सुशांत पाटील आणि अ‍ॅड. अनुजा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे उद्योगांशी दृढ संबंध प्रस्थापित झाले असून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा विशेष भर असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माळी यांच्या शैक्षणिक नेतृत्वामुळे, योग्य नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाले आहे. तसेच सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देत या निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेच नव्हे, तर संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या कटिबद्धतेचे द्योतक असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे, तर उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण, नवोन्मेषात्मक शिक्षणपद्धतीचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– डॉ. सुशांत पाटील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button