ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या चिमुरड्यांनी घडवले विठ्ठलनामाच्या जयघोषात ‘स्वच्छता आणि पर्यावरण’ रक्षणाचे प्रबोधन!

​ थेरगाव परिसर झाला भक्तीमय; दिंडीत लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :

येथील ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या वतीने शनिवार रोजी आषाढी वारी निमित्त भव्य आणि विलोभनीय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे संपूर्ण थेरगाव परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला होता.

​ आकर्षक पालखी आणि सांस्कृतिक वेशभूषा

दिंडीसाठी आकर्षक फुलांची सजावट केलेली भव्य पालखी, अबदागिरी, छत्र्या, आणि भगवे झेंडे मुख्य आकर्षण ठरले. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. शाळेतील सर्व मुला-मुलींनी पारंपरिक व सांस्कृतिक पोशाख परिधान केला असल्यामुळे संपूर्ण थेरगाव परिसरात एक वेगळाच रंग भरला होता. हा सोहळा इतका जिवंत आणि वास्तविक होता की, थेरगावमधील आबालवृद्ध आणि महिला वर्गाने ठिकठिकाणी पालखी थांबवून मनोभावे औक्षण केले व विठ्ठलाचे दर्शन घेतले.

​ अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश

केवळ भक्तीच नव्हे, तर समाजात जागृती निर्माण करण्याचा संदेशही या दिंडीतून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ‘स्वच्छता राखा’, ‘पाणी वाचवा’, ‘वृक्ष लागवड करा’, ‘आपला परिसर स्वच्छ ठेवा’ अशा विविध सामाजिक घोषणांचे फलक होते. अध्यात्माची सांगड घालून काळाची गरज असलेले हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम या चिमुरड्यांनी केले.

हेही वाचा –  इंग्लंड विरुद्ध पाचवा सामना भारतासाठी फक्त प्रतिष्ठेचा विषय नाही, हा इंग्लिश खेळाडू रोहित शर्माच्या पुढे निघून जाईल

​ दिंडीचे थाटात पूजन व मान्यवरांची उपस्थिती

दिंडीची सुरुवात करताना पालखीचे विधीवत पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर, सचिव श्री. अशोक मोरे सर, खजिनदार सौ. सुरेखा पवार मॅडम, उपाध्यक्ष श्री. निलेश पलघोमल सर व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका विद्या नाईक मॅडम, नायगम इग्निस मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

​ शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी धरला फुगडीचा फेर

मुलांचा अथांग उत्साह पाहून उपस्थित मान्यवरांनाही विठ्ठलनामाचा जयघोष करण्याचा मोह आवरला नाही. दिंडीदरम्यान सर्व शिक्षक, शिक्षिका आणि मोठ्या विद्यार्थिनींनी रस्त्यावरच फुगडीचा फेर धरला. या फुगडीमुळे पालखी सोहळ्याचा आनंद आणि उत्साह द्विगुणीत झाला. अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात हा दिंडी सोहळा संपन्न झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button