Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील’; ठाकरे गटातील आमदाराचा रश्मी ठाकरेंना शब्द

अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा शब्द विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना दिला आहे.

रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू, असं विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा आपमान केला जातोय. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button