Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये चेटकीण समजून मुलाने केली 65 वर्षीय आईची हत्या

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आपल्या आईला चेटकीण समजून चाकूने वार करत हत्या केली आहे. या घटनेत आईचा जागेवरचं मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपी हत्येनंतर बराच वेळ आपल्या आईबरोबर बसला होता. त्यानंतर गावकऱ्यांची त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत.

आईवर चेटकीणीची सावली असून ती जादूटोणा करत असल्याचा आरोप मुलाने केलेला आहे. या कारणामुळे आपण आईची हत्या केल्याचंही त्याने कबूल केलेलं आहे. प्राप्त माहितीनुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वरच्या करौली गावात 45 वर्षांच्या गणपतने जादूटोण्याच्या भीतीने त्याच्या आईची निर्दयपणे हत्या केलेली आहे. यात 65 वर्षीय आई काला बाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलाला अटक केलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button