ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डॉ. सुशांत पाटील ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्लेसमेंटचा भव्य गौरव

शिक्षण विश्व: “Placements’ Gateway to Corporate” कार्यक्रम

पुणे | शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या डॉ. सुशांत पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्लेसमेंटचा गौरव करण्यासाठी “Placements’ Gateway to Corporate” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट सहाय्य देत देशातील विविध नामांकित तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मिळालेल्या यशस्वी नोकऱ्यांचा आनंद या कार्यक्रमातून साजरा करण्यात आला.

डॉ. सुशांत पाटील ग्रुपच्या डॉ. डी. वाय. पाटील वराळे कॅम्पसमधील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट आणि डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उल्लेखनीय प्लेसमेंट मिळवले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांचे समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.

Grand Felicitation of Students for Successful Placements by the Dr. Sushant Patil Group

हेही वाचा

प्रा . डॉ. आबाजी माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ प्रदान

कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन डॉ. सुशांत पाटील आणि सचिव तथा CEO ॲड.अनुजा सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हाने, प्लेसमेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण रचना, व्यक्तिमत्त्व विकास तसेच वेगाने वाढणाऱ्या AI युगाशी जुळवून घेण्याचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने कौशल्यविकास करत आत्मविश्वासाने करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोषराव बोर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील संधी, अपेक्षा आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक तयारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माळी, प्राचार्य डॉ. मेघना भिलारे, प्राचार्य डॉ. सुरेश शिरभदूरकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. ललित पवार, रजिस्ट्रार प्रा. प्रदीप खांडवे, चीफ अकाउंट ऑफिसर श्री. संजय भोर, प्रा. राहुल मिश्रा, प्रा. मयुरेश चोळकर, प्रा. आशिष जावके, प्रा. श्वेता बोर्से तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक…

कार्यक्रमाचा समारोप प्लेस झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत उत्साहपूर्ण केक कटिंग समारंभाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन यशदा पालनकर यांनी करत संपूर्ण कार्यक्रम अधिक आकर्षक व संस्मरणीय बनवला. “विद्यार्थ्यांनी सतत प्रगती करावी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडवावे आणि आपल्या करिअरमध्ये सर्वोत्तम यश मिळवावे,” हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. सुशांत पाटील आणि ॲड. अनुजा पाटील यांनी सांगितले. “Placements’ Gateway to Corporate” हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा, प्रेरणादायी आणि शिक्षणासोबत करिअर घडविण्याच्या संस्थेच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button