अजितदादांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेंवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला योग्य वाटत नाही

कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना?
मुंबई : अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे कामाला लागा, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपुर्वी केलं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाक या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना उद्देशून एक विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं की, आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्याला आता अदजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळं कामाला लागा, असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.





