Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“कलाटेंच्या बंडखोरीमागं खरा सूत्रधार तिसराच कोणतरी”; अजित पवार

ठाकरे त्यांच्या मतदारांना नाना काटे यांना मतदान करण्याचं आवाहन करतील

पुणे : शिवसेनेची बंडखोरी झाली त्यासाठी आदित्य ठाकरे सोमवारी तिथं येणार आहेत. सचिन अहिर यांनी देखील ही थोपवण्यासाठी प्रयत्न केले. पण बंडखोरी होण्यामागं सुत्रधार कोणतरी तिसराच दिसतोय. कारण बंडखोरी झाल्यानंतर मतांची विभागणी होऊन इतर पक्षांना फायदा व्हावा यासाठी कोणीतरी हे केलं असावं, असं वक्तव्य विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.

पण मी तिथं गेल्यावर याची माहिती घेईल. पण कोणी जर हे केलं असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारांना आवाहन करतील की, तिन्ही पक्षांचा मिळून महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे आहेत. त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील असा मला ठाम विश्वास आहे, असंही अजित पवार म्हणाले.

तुम्हाला जर ऐकायचंच नाही, हे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर असंही राजकारण खेळलं जाऊ शकतं. याबाबत आम्ही मतदारांना जागृत करु, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button