..तेव्हाच ‘उदय’ होणार होता; संजय राऊतांचा मोठा दावा
शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं : संजय राऊत

मुंबई | दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे पोहोचले आहेत. उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावटळ उठली आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, की एकनाथ शिंदेंचं दरे हे त्यांचं दावोस आहे. तिथे जाऊन ते पक्षात, कुटुंबात आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात. त्यांनी आता नागा साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं. नागासाधूही अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात, तंबूत बसतात. कोणी आयआयटीवाला बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळ्यात ध्यानधारणा करावी.
हेही वाचा : ‘बीडचं पालकत्व मिळालं असतं, तर..’; पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत
एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण कळलं पाहिजे : संजय राऊत
एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, तसं ते गावी जातात. त्यामुळे नाराजीचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. शिवसेना संपली नाही, ती संपणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ती पुन्हा उसळेल. ही भाजपाची कुटनीती आहे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असलेल्यांना ते उद्ध्वस्त करतात, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलेयं. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.





